कापूस केंद्रच नाही, विकायचा तरी कुठे?

akola  murtizapur needs center for cotton purchesing
akola  murtizapur needs center for cotton purchesing
Updated on

मूर्तिजापूर (जि.अकोला): तालुक्यात अजून कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. तालुक्यातील शेकडो क्विंटल कापूस अजूनही बळीराजाच्या घरातच असून नगदी पीक म्हणून ओळख असल्येल्या कापसाला विक्रीची अडचण येत आहे.

कापूस हे वऱ्हाडातील प्रमुख पीक आहे, फेडरेशन बंद झाल्यापासून मोठ्या प्रमाणात सोयाबीनकडे वळलेला या भागातील शेतकरी पुन्हा कापूस पिकाकडे परततो आहे. मात्र आस्मानी अन् सुलतानी संकटातून सुटण्याच्या प्रयत्नातील शेतकरी कोरोनाच्या मुकाबल्याचा प्रभावी पर्याय असणाऱ्या लॉकडाऊनमुळे जेरीस येत असतांनाच या तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे पुरता हवालदील झाला आहे.

पणन संचालनालयाच्या निर्देशानुसार अटी व शर्तींच्या अधिन राहून येथील केंद्र वगळता जिल्ह्यातील अन्य पाच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात घरात पडून आहे. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे स्रोत बंद आहेत. अशा अवस्थेत पेरणीपूर्व मशागत आणि कूटुंबियांच्या उपजिविकेसाठी उत्पन्नाचा पर्याय म्हणून कापूस विकण्याच्या आशेने अकोला किंवा जिल्ह्यातील अन्य केंद्रावर गेलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस त्या केंद्रांवर खरेदी करण्यासाठी नोंदणी करून घेतल्या जाते. मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्य केंद्रांनी झिडकारले असल्याने शेतकरी राजा हवालदील झाला आहे.

पणन संचालकांचे निर्देश नसल्यामुळे येथील कापूस खरेदी केंद्र बंद आहे. अकोल्यात नोंदणी सुरु आहे. नोंदणी झाल्यानंतर ते कॉल करतात. एफएक्यू दर्जाचा लांब धाग्याचा कापूस सीसीआय खरेदी करते. नॉन एफएक्यू खासगी व्यापारी खरेदी करतात.
-रितेश मडगे, सचिव, कृउबास, मूर्तिजापूर.

संबधित यंत्रणेशी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या माध्यमातून बोलणे झाले. कोरोनाचे संकट गडद न झाल्या दोन दिवसात मूर्तिजापुरातील कापूस खरेदी केंद्र सुरू होईल. 
-हरीश पिंपळे, आमदार, मूर्तिजापूर

तालुक्यात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा दरवर्षी कपाशीकडे अधिक कल असतो. मात्र, उत्पादन केलेल्या कापसाला विक्रीसाठी ठिकाणच नसल्याने शेतकऱ्यांची उपेक्षा होत आहे.
-संजय भाऊराव देशमुख, शेतकरी, घुंगशी

कापूस कैफीयत आंदोलन
तीन ग्रेडमध्ये कापूस खरेदी करा, एका दिवशी २० गाड्या खरेदीची अट काढून टाका, सर्वच कापूस खरेदी करा, अशा मागण्या गुरूवारी(ता.३०) सर्व शेतकरी बांधव मुख्यमंत्री, पणन मंत्री, सहकार मंत्री, पालक मंत्री, खासदार, आमदारांना फोन करून शेतकरी संघटनेच्या कापूस कैफीयत आंदोलनांमधून करणार आहेत.
-सुरेश जोगळे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Superintendent of Police Kumar Chinta instructed school heads to install CCTV cameras, maintain complaint boxes and ensure proper verification of school transport staff.
His sacrifice has left his native village Marartola and Kurkheda taluka mourning.
Invitations Distributed, Venue Ready—But Groom Never Arrived Over Dowry Dispute
Young Voice, Strong Resolve: Namrata's Journey to Jantar Mantar Inspires Fellow Students
Marathi News Esakal
www.esakal.com